Forest Department agrowon
ताज्या बातम्या

Forest Department : वन्यजीव अधिवासाचे लेखी निर्णय लवकर द्या

किसान सभेच्या जिल्हा समितीचा इशारा

Team Agrowon

मंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर(Bhimashankar) येथे अभयारण्यातील विविध प्रश्‍नांबाबत चर्चा आणि बैठकीतील निर्णय लेखी स्वरूपात ग्रामसभांना दिले जातील, असे वनविभागाकडून (Forest Department) सांगण्यात आले होते; परंतु या बैठकीतील चर्चा आणि निर्णय लेखी स्वरूपात अद्याप मिळाले नाहीत.

झालेल्या बैठकीतील वास्तव चर्चेवर आधारित असे लेखी पत्र न मिळाल्यास मंचर येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर किसान सभेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेच्या जिल्हा समितीने दिला आहे.

समितीतर्फे आंदोलनाच्या इशाऱ्याबाबतचे पत्र उपवनसरंक्षक अमोल थोरात यांना देण्यात आले आहे. भीमाशंकर अभयारण्यातील धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मितीबाबत शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक मागील महिन्यात भीमाशंकर येथे झाली.

त्यातील चर्चा आणि निर्णय लेखी स्वरूपात ग्रामसभांना दिले जातील, असे वनविभागाकडून सांगण्यात आले होते; परंतु ते दिले नाहीत. हे निर्णय लेखी स्वरूपात त्वरित मिळावेत, यासाठी हे निवेदन दिले आहे.

बैठकीला उपस्थित सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी जे मुद्दे नमूद केले होते, ते सर्व मुद्दे सविस्तरपणे या पत्रात असावेत, अशी मागणी करण्यात आली. किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, सचिव विश्वनाथ निगळे, उपाध्यक्ष अॅड. नाथा शिंगाडे, राजू घोडे, सहसचिव अशोक पेकारी, खजिनदार विकास भाईक आदींनी निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT