Onion Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : कांदा प्रश्नावर राहुरीत आज ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

राज्यात सध्या कांदा उत्पादकांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडलेले असल्यामुळे कांदा उत्पादकांना खर्चही निघेनासा झाला आहे.

Team Agrowon

Onion Market Update नगर : कांद्याला प्रति क्विंटल अडीच हजार रुपये किमान हमी भाव (Onion MSP) मिळावा व प्रति क्विंटल पाचशे रुपये निर्यात प्रोत्साहन (Onion Export Subsidy) अनुदान मिळावे. यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २८) राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन (Farmer Protest) करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.

राज्यात सध्या कांदा उत्पादकांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडलेले असल्यामुळे कांदा उत्पादकांना खर्चही निघेनासा झाला आहे. कांदा उत्पादकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असतानाही शासनाकडून उत्पादकांना दिलासा देण्यासारखा कुठलाही निर्णय घेतला जात नाही.

कांदा परवडत नसल्यामुळे आता शेतकरी कांद्याचे पीक शेतातच नष्ट करू लागले आहेत. शासनाने कांदा उत्पादनाकडे प्राधान्याने लक्ष देऊन मदत करावी, कांदा निर्यातीवर ५०० रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, कांद्याला हमी भाव २५०० रुपये प्रति क्विंटल मिळावा,

‘नाफेड’मार्फत कांदा २५०० रुपये किंटलने कांदा खरेदी करावी, अतिवृष्टीने व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मंगळवारी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे रवी मोरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT