Maharashtra Budget Session Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session: कांद्याच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गळ्यात कांद्याच्या माळा घालून विरोधकांचे आंदोलन

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने थेट मदत करावी, सरकारने कांद्याची खरेदी तातडीने सुरू करावी या मागण्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडल्या.

Team Agrowon

Maharashtra Budget Session कांद्याचे दर (Onion Rate) पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. त्याची प्रतिक्रिया विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटली आहे.

आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कांद्याच्या दराच्या (Onion Market Rate) प्रश्नावरून सभागृहाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

विरोधी पक्षांचे आमदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत होते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने थेट मदत करावी, सरकारने कांद्याची खरेदी तातडीने सुरू करावी या मागण्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडल्या.

तसेच कांद्याबरोबरच कापूस, द्राक्ष आणि इतर शेतमालाचे भाव पडले आहेत. हे दर वाढण्यासाठी सरकारने तात्काळ उपाय योजावेत, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर आमदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांचे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून (ता. २७) सुरू झाले. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजण्याची चिन्हे आहेत. सभागृहाच्या बाहेर विरोधकांनी निदर्शने करून त्याची चुणूक दाखवली आहे.

सभागृहाच्या आतही शेतमालाच्या विशेषतः कांद्याच्या भावाच्या मुद्यावरून विरोधक सरकारला घेरणार असल्याची चिन्हे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana 21st Installment 2025: पंतप्रधान मोदींची ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची भेट; खात्यात २ हजार रुपये जमा

Hawaman Andaj: धुळ्यात निचांकी तापमानाची नोंद; राज्यात किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका कायम

Farmer Relief: सांगलीत शेतकऱ्यांच्या खात्यात २३.२९ कोटी अनुदान वर्ग

Smart Farming: मशागत यंत्रातील स्वयंचलन

Paddy Harvest: थंडीच्या लाटेत शेतकरी कामात गर्क

SCROLL FOR NEXT