Cotton Farmer Protest Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Policy : कापसाची होळी करून केंद्र सरकारचा निषेध

सध्या केंद्र सरकारने देखील कापूस उत्पादकांसाठी शोषणाचे धोरण अवलंबिल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

Team Agrowon

Cotton Farmer Protest अमरावती ः कापूस एकाधिकारी मोडीत काढीत सीमापार कापूस नेण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता.

यामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्याला श्रद्धांजली तसेच सध्या केंद्र सरकारच्या कापूस उत्पादकांप्रती असलेल्या विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

राज्यात कधीकाळी कापूस एकाधिकारी योजना लागू करण्यात आली होती. त्यामुळे इतर राज्यात कापसाचे दर अधिक असतानाही कापूस उत्पादकांना आपला कापूस नेता येत नव्हता.

हा एकाधिकार मोडून काढण्यासाठी बहिरम येथे कापूस उत्पादकांनी सीमापार कापूस आंदोलन केले. हे आंदोलन अनियंत्रित झाल्याने पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एक शेतकरी शहीद झाला तर काही जखमी झाले.

या शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता.

सध्या केंद्र सरकारने देखील कापूस उत्पादकांसाठी शोषणाचे धोरण अवलंबिल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. देशात कापसाचे दर कमी असताना केंद्र सरकारने हे दर आणखी कमी कसे होतील याच उद्देशाने कापसाची आयात केली.

केंद्र सरकार देखील ब्रिटीशांप्रमाणेच वागत असल्याचा आरोप या वेळी साबळे यांनी केला. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून यावेळी कापूस उत्पादकांनी त्यांच्याकडील कापसाची होळी केली. या वेळी केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT