Dam Affected Protest Agrowon
ताज्या बातम्या

Warna Dam : वारणा धरणग्रस्तांचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेकडो महिला, पुरुष व तरुण आंदोलनात सहभागी झाले आहेत. शांततेने सुरू असलेल्या आंदोलकांनी मंगळवारी दुपारी अचानक आक्रमक पवित्रा घेतला.

Team Agrowon

इस्लामपूर, जि. सांगली ः येथे रविवारपासून (ता. १५) मागण्यांसाठी धरणे आंदोलन (Protest) करणाऱ्या वारणा धरणग्रस्तांच्या (Dam Affected) सहनशीलतेचा बांध मंगळवारी (ता. १७) फुटला. शेकडो आंदोलक पोलिसांचे कडे तोडून व बंद केलेले मुख्य प्रवेशद्वार तोडून तहसील कार्यालयात घुसले आणि दिवसभर तिथेच ठिय्या मारला.

कब्जेपट्टी व हक्कापोटी लाखो रुपये भरावेत, अशा दिलेल्या नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात व आदेश रद्द करावेत, यासाठी गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

शेकडो महिला, पुरुष व तरुण आंदोलनात सहभागी झाले आहेत. शांततेने सुरू असलेल्या आंदोलकांनी मंगळवारी दुपारी अचानक आक्रमक पवित्रा घेतला.

आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडले व तहसील कचेरीचे मुख्य प्रवेशद्वार तोडून कार्यालयात घुसून तेथेच ठिय्या मारला. त्यामुळे कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आले.

निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. दुपारी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह शिवसेना, भाजप नेत्यांनी पुढाकार घेत तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्याशी चर्चा केली.

मागण्या पूर्ण मान्य होईपर्यंत ठाम राहण्याची भूमिका धरणग्रस्त यांनी घेतली आहे. खासदार धैर्यशील माने, सत्यजित देशमुख यांनीही आंदोलकांना आश्वस्त केले; मात्र चर्चेला आलेले अधिकारी पोलिसांसह फौजफाटा सोबत घेऊन आल्याने आंदोलक संतप्त झाले.

गौरव नायकवडी म्हणाले, की आपण उन्हात बसणार व अधिकारी एसीत, हे चालणार नाही. त्यांना उपद्रव करत नाही म्हणून अधिकारी निर्लज्ज झालेत. आंदोलन तीव्र करू.

खासदार धैर्यशील माने यांनी आंदोलकांना अपेक्षित तोडगा लवकरच काढू, असे आश्‍वासन दिले. माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडिक, विक्रम पाटील आंदोलनस्थळी आले. गौरव नायकवडी यांनी शांतपणे आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन केले.

‘फडणवीसांशी चर्चेची तारीख द्या’

‘आश्वासने खूप झाली, आता माघार नाही. अधिकारी स्तरावरील प्रश्न सोडवावेत, तरच थांबू व तसे लेखी घेऊ. शासनस्तरावरच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेची तारीख द्या, मगच उठू, असा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला.

दृष्टिक्षेपात आंदोलन

१) धरणातून बाहेर पडणारे पाणी व वीज थांबवण्याचा इशारा

२) पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर यांच्या बदलीची खासदारांकडे मागणी

३) अधिकाऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्याचा आलेला प्रस्ताव धुडकावला

४) ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांना आदरांजली व आंदोलन सुरू

५) ‘महसूल’, ‘पुनर्वसन’चे सचिव विकास खार्गेंशी खासदार माने यांनी चर्चा घडवली

६) सदाभाऊ खोत यांची वनमंत्री मुनगंटीवार यांच्या सचिवांशी संपर्क साधून बैठकीसंदर्भात विनंती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT