Animal Committee
Animal Committee Agrowon
ताज्या बातम्या

Animal Welfare Committee : ‘प्राणी क्लेष’ समितीसाठी प्रस्ताव सादर करावेत

Team Agrowon

परभणी ः राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटी समितीमध्ये (Animal Welfare Committee) अशासकीय सदस्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे खालील अटी पूर्ण करणाऱ्या अशासकीय सदस्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील गोशाळा (Go Shala), पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी (Animal Welfare) कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि संबंधित जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या पाच ते दहा कार्यकर्त्यांची अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल (Anchal Goyal) यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या शिफारशी विचारात घेऊन राज्य शासनाकडून नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यात येणार आहे.

या अशासकीय सदस्यांची नियुक्ती तीन वर्षासाठी राहील. परंतु कोणत्याही अशासकीय सदस्याला काढून टाकण्याचे अधिकार शासनास राहतील.

तेव्हा परभणी जिल्ह्यातील संबंधित इच्छुक व्यक्तींनी आपली वैयक्तिक माहिती बायोडाटा) दोन प्रतीत प्राणी कल्याणविषयक केलेल्या कामाच्या तपशील व छायाचित्रासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात २० फेब्रुवारीपूर्वी मिळेल अशारीतीने पाठविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी केले आहे.

अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने यापूर्वी इच्छुक व्यक्तींनी वरील बाबींसाठी आपले प्रस्ताव या कार्यालयास सादर केले असतील त्यांनी नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

Department Of Water Resources : ‘कृष्णा खोरे’ची ६६८ कोटींची पाणीपट्टी वसुली

SCROLL FOR NEXT