Khed APMC
Khed APMC Agrowon
ताज्या बातम्या

APMC Profit : खेड बाजार समितीला दोन कोटींचा नफा

टीम ॲग्रोवन

राजगुरुनगर : खेड बाजार समितीची (Khed Bajar Samite) वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. बाजार समितीला मागील आर्थिक वर्षांत एक कोटी ९४ लाख ३८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, आगामी काळात आळंदी येथे उपबाजार सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे (Balasabheb Dhandre) यांनी दिली.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.३०) राजगुरुनगर येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील समितीच्या सभागृहात पार पडली. या वेळी समितीवर नेमण्यात आलेले प्रशासक हरिश्चंद्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

या वेळी संचालक चंद्रकांत इंगवले, विलास कातोरे, सयाजी मोहिते, बाबाजी काळे, धैर्यशील पानसरे, अशोक राक्षे, शांताराम भोसले, कैलास लिभोरे, महिला प्रतिनिधी वंदना सातपुते यांच्यासह ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, हमाल अडते यांची प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी वर्षभरातील विकासकामांचा आढावा घेत अहवाल आणि आर्थिक ताळेबंद यांचे वाचन केले. या समवेत संचालक रमेश राजे, बाबाजी काळे, शांताराम पोसले, अशोक राक्षे यांच्यासह बाळासाहेब चौधरी, रमेश गोरे, कुमार गोरे, चांगदेव बोराटे, सह कोळेकर, आबा गोरे, संजय वाहिले, दशरथ काचोळे यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासक कांबळे यांनी समर्पक उत्तरे दिली.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, आळंदी येथे उपबाजार बाजार सुरू करावा, तरकारी शेड बांधावे, बाजारात आलेल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, जेवणाची चांगली व्यवस्था करावी. बाजार गाळ्यांमध्ये पोटभाडेकरू, बाजार समित्यांमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

आळंदी येथे नव्याने उपबाजार करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि मार्केटला उत्पन्न कसे मिळेल, याबाबत सर्वांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढला जाईल.

- हरिश्चंद्र कांबळे, प्रशासक, खेड बाजार समिती, खेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT