Millet Products Agrowon
ताज्या बातम्या

Millet Products: तृणधान्यापासून विविध पदार्थ उत्पादने करा

तृणधान्यापासून विविध पदार्थ तयार करून लोकांपर्यंत पोहचवाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः आहारात तृणधान्याचा (Millet) वापर वाढविणे आरोग्यासाठी हितकारक आहे.

तृणधान्ये आरोग्यदायी (Healthy millets) असल्याने आहारात मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक असून यासाठी कृषी विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी.

तृणधान्यापासून विविध पदार्थ तयार करून लोकांपर्यंत पोहचवाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने कृषी विभागामार्फत मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले आदी उपस्थित होते.

डॉ. दयानिधी म्हणाले, की तृणधान्याचा वापर वाढविण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. यासाठी तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनविण्याची रेसीपी लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे.

तृणधान्यापासून विविध प्रकार बनविण्याचे तंत्र विकसित असून ते लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महिला बचत गटांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे.

शासकीय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतही तृणधान्याचे पदार्थ देण्याचा वापर वाढवावा. प्रकाश सूर्यवंशी यांनी आहारातील तृणधान्याचे महत्त्व सांगितले.

ज्वारी व बाजरी पिकांचे उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या कृषी सहायकांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT