ताज्या बातम्या

Doubling Farmers Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याला प्राधान्यः पीयुष गोयल

टीम ॲग्रोवन

शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट (Double Farmer Income) करणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, याचा पुनरूच्चार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी केला. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (Network For Digital Commerce) ( ओएनडीसी ONDC) आणि नाबार्ड (NABARD) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

वाणिज्यमंत्री गोयल म्हणाले, " सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. नीती आयोगाने त्यासाठी रोडमॅप दिला आहे. त्यानुसार दुप्पट उत्पन्नाचं उद्दीष्ट गाठण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दरवर्षी १०.४१ टक्क्यांनी वाढ करावी लागेल."

यावेळी वाणिज्यमंत्री गोयल यांनी ई-कॉमर्स क्षेत्रातील बड्या कंपन्यांवर टीकास्त्र सोडलं. ई-कॉमर्स साइट्स किंवा इतर ऑनलाइन वेबसाईट ग्राहक विशिष्ट पुरवठादारांकडे जावेत, यासाठी विशिष्ट अल्गोरिदम वापरतात, त्यामुळे त्यांना अधिकचा नफा मिळतो, असे गोयल म्हणाले. अॅमेझॉनसारख्या मोठ्या टेक कंपन्यांशी बरोबरी करू न शकणाऱ्या छोट्या किराणा दुकानदारांना किंवा त्यासारख्या व्यावसायिकांना सरकारद्वारे चालविण्यात येत असलेला ओएनडीसी उपक्रम मदत करेल.

गोयल म्हणाले " ओएनडीसी उपक्रमामुळे किराणा दुकाने आधुनिक व हाय प्रोफाईल दुकानांशी स्पर्धा करू शकतील. फक्त टिकाव धरण्यापुरते नाहीतर पुढे जाऊन आपले उत्पन्न वाढवण्यास देखील ही दुकाने सक्षम असतील. कोईमतुर येथे प्रायोगिक स्वरूपात हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचा आता विस्तार केला जाणार आहे."

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT