Sandipan Bhumre Agrowon
ताज्या बातम्या

Sandipan Bhumre : कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसविण्यास प्राधान्य

स्मशानभूमी बांधणे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवणे यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय सोमवारी (ता. १७) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : डीपीअभावी शेतकऱ्यांचे नुकसान (Farmer's Loss) होऊ नये यासाठी डीपी जळाल्यानंतर तातडीने नवीन डीपी (Electric Transformer) बसवणे, ज्या गावात स्मशानभूमी नाही, त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधणे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांना (Kolhapuri Barrage) गेट बसवणे यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय सोमवारी (ता. १७) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी सांगितले.

श्री. भुमरे म्हणाले, की यापूर्वी जिल्हा नियोजन समितीचे ५०० कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. या नियोजनामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रोहित्र बदलण्यासाठी महावितरण कडून ३६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र ४० कोटींची जरी मागणी पडली, तरी आमची देण्याची तयारी असल्याचे, पालकमंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले.

कोल्हापुर बंधाऱ्यांसाठी प्राधान्य...

कोल्हापुरी बंधाऱ्यांना ३००० गेट नव्हते. या गेटअभावी पाणी वाहून जाते. यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांना तीन हजार गेट बसवण्यासाठी प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. ज्या ज्या विभागांकडून जशी जशी मागणी तसा निधी देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

निधीसाठी ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्व विभागांनी प्रस्ताव देण्याच्या आणि आलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या पाचशे कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. या नियोजनामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त शेतकऱ्यांसाठी रोहित्र, स्मशानभूमी बांधकाम कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT