Narendra Modi  Agrowon
ताज्या बातम्या

Narendra Modi News : पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर

Modi On America Tour : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २४ जून या काळात अमेरिका दौऱ्यावर जात आहेत.

Team Agrowon

Narendra Modi Latest News : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २४ जून या काळात अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात मोदी अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रालाही संबोधित करणार आहेत. मोदी २१ जूनला संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योगदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, येथेही मेरी मिलबेन हजर असतील.

अमेरिकेमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. मोदी २३ जून रोजी भारतीय समुदायासमोर भाषण करणार असून या वेळी ‘ओम जय जगदीश हरे’ हे गाणे म्हटल्याने भारतात चर्चेत आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका असलेल्या मेरी मिलबेन या सादरीकरण करणार आहेत.

भारतीय समुदायही मोदींचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्यासाठी उत्सुक असून त्यांनी एका भव्य कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. ही संधी मिळाल्याबद्दल मिलबेन यांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ हे ‘जी-२०’चे घोषवाक्य आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर हे घोषवाक्य संयुक्तिक आहे. अमेरिका आणि भारत या जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांमधील मैत्रीचे हे प्रतीक आहे. ही मैत्री जागतिक लोकशाहीसाठीची एक मोठी शक्ती आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT