snake bite  Agrowon
ताज्या बातम्या

Snake Bite : पावसाळ्यातील सर्पदंश सर्पदंश कसा टाळावा

Snake bite workshop : सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हालचाल करू देऊ नये, पट्टा, दागिन कडे, अंगठी, घड्याळ काढून टाकावे. कारण दंश झालेल्या जागेवर सूज येऊ शकते.

Team Agrowon

Bhandara News : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, भंडारा व स्नेकबाइट हिलिंग ॲन्ड एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या समन्वयाने तुमसर व मोहाडी येथे सर्पदंश, काळजी व उपाययोजना या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत डॉ. प्रियांका कदम (संस्थापक, स्नेकबाईट हिलिंग अँड एज्युकेशन सोसायटी मुंबई) यांनी सर्पदंश, काळजी व उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले.

सर्पदंश कसा टाळावा

बाहेर जाताना बुटांचा वापर करणे.

रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर करणे.

खाली जमिनीवर झोपणे टाळणे व मच्छरदाणीचा वापर करणे.

घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे व उंदरांची संख्या नियंत्रित ठेवणे.

सर्पदंशावर उपाय

सर्पदंश झाल्यास १०४, १०८, ११२ या क्रमांकावर कॉल करून गाडीची व्यवस्था करणे.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीस हालचाल करू देऊ नये, पट्टा, दागिन कडे, अंगठी, घड्याळ काढून टाकावे. कारण दंश झालेल्या जागेवर सूज येऊ शकते.

मिळेल त्या वाहनाने रुग्णास जवळच्या रुग्णालयात पोहोचविणे.

रुग्णास रुग्णालयात नेताना डाव्या कुशीवर झोपवून त्याचा उजवा पाय दुमडून उजवा हात चेहऱ्याखाली ठेवावा. त्यामुळे श्‍वास नीट घेता येईल. उलटी झाल्यास श्‍वसननलिका बंद होणार नाही. दंशाबद्वलची सर्व माहिती डॉक्टरांना द्यावी.

हे करू नका...

सर्पदंश झाल्यावर घाबरू नये, त्यावर इलाज उपलब्ध आहे.

तंत्रमंत्राने विष उतरत नाही, कुठल्याही तांत्रिक किंवा मांत्रिकाच्या नादी लागू नये, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये. त्यामुळे होईल तेवढे लवकर डॉक्टरांकडे घेऊन जावे.

साप चावलेल्या जागेवर चिरा मारू नये तसेच तोंडाने विष ओढण्याचा प्रयत्न करू नये.

आवळपट्टी बांधू नये, दंश झालेल्या जागी बर्फ लावू नये तसेच मालिश करू नये.

स्वत: उपचार करू नये, तसेच कुठलेही वनस्पती, मसाले इ. वापरू नये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT