Mineral Extraction Agrowon
ताज्या बातम्या

अवैध गौण खनिज वाहतुकीला प्रतिबंध

नागपूर : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासोबतच अवैध वाळू व गौण खनिज वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासोबतच अवैध वाळू व गौण खनिज वाहतुकीकडे (Mineral Transport) आपला मोर्चा वळवला आहे. या अवैध वाहतुकीला प्रतिबंध (Illegal Transport Prohibition) घालण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांवर चेकपोस्ट लावण्यासोबतच सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक, रस्ते वाहतूक विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी कडक उपाय करण्याचे आदेश दिले. तीनही विभागांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना केल्या. यापूर्वीच त्यांनी सर्व तहसीलदारांकडून अवैध वाळू वाहतूक होणाऱ्या मार्गांची यादी करून घेतली.

तहसीलदारांकडून जवळपास ४२ रस्त्यांची यादी पाठविण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील जवळपास ३० रस्त्यांवर चेकपोस्ट लावण्यात येणार आहे. याची नावे लवकरच अंतिम होणार आहे. या चेकपोस्टवर चोवीस तास सुरक्षारक्षक राहणार आहे. त्याच प्रमाणे सीसीटीव्हीसुद्धा लावण्यात येणार आहे. वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व विभागांना दिले.

कुर्वेंनी केला होता ड्रोनचा वापर

तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी वाळू घाटांवरील वाळू उपशावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला होता. या ड्रोनमुळे अवैध वाळू उपशावर बऱ्यापैकी नियंत्रण आले होते.

वाळूवर अनेकांची नजर

जिल्ह्यात अनेक घाटांवरून वाळूउपसा करण्यावर निर्बंध आहेत. त्या नंतरही मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याचे सांगण्यात येते. शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार होत असल्याची चर्चा आहे. अनेकांची नजर या वाळूवर आहे. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती यात आघाडीवर असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये आहे. काही राजकीय नेत्यांचे नाव तर अनेक जण दबक्या आवाजात घेतात. राज्यात झालेल्या संत्तांतराचा परिणामही या वाळू धोरणावर होत असल्याची चर्चा रंगली आहे.

चेकपोस्ट प्रस्तावित रस्ते

तालुका रस्ते संख्या

सावनेर ८

पारशिवनी ४

कामठी ६

ना. ग्रामीण ३

कुही ४

कळमेश्वर ३

रामटेक ३

हिंगणा ३

मौदा २

नरखेड २

उमरेड १

भिवापूर १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

Protest On NAFED: कांदा प्रश्नावर नाशिकमध्ये काँग्रेसचा नाफेडवर मोर्चा; पारदर्शक खरेदीची मागणी

Crop Loss: केळी, कांदा नुकसानीची भरपाई मिळण्याची प्रतीक्षा

Dry Rivers: खानदेशात अनेक नद्या कोरड्या

Urad Crop Loss: कमी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाला फटका

SCROLL FOR NEXT