Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील २०६ मंडलांमध्ये पावसाची हजेरी

Latest Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यांतील २०६ मंडलांत शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यांतील २०६ मंडलांत शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली.

छत्रपती संभाजीनगर, जालना व लातूरमधील प्रत्येकी एका मंडलात अतिवृष्टी झाली. तर बहुतांश मंडलांत पावसाची हजेरी तुरळक ते हलक्या स्वरूपाची राहिली. पडणारा पाऊस पेरणी झालेल्या पिकासाठी संजीवनी मानला जातो आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील ८३ पैकी ४७ मंडलांमध्ये पावसाची हजेरी तुरळक, हलक्या, मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील डोनगाव मंडलात ६६.८ मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाली.

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ मंडलात पावसाची हजेरी तुरळक, हलक्या, मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली. जालना ग्रामीण मंडलात ९८.८ मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाली.

इतर तालुक्यांच्या तुलनेत जालना तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३३ मंडलात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५४ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील बोरोळ मंडलात ६९ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. देवणी व उदगीर तालुक्यांतील मंडलांमध्ये पावसाचा जोर थोडा अधिक होता. धाराशिव जिल्ह्यातील ४२ पैकी केवळ २६ मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला.

जिल्हानिहाय पावसाची मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी २५.८, चित्तेपिंपळगाव १८, करमाड २५.३, शेकटा ५७.३, चिंचोली ४२.३, करंजखेड ३९.३, नागद २३.८, बाजारसांगवी ३२, निल्लोड ५२.८, आमठाणा २१.५, अंभई १७.८, बनोटी ४१.३.

जालना जिल्हा : जाफराबाद २२.८, जालना शहर ४३.८, नेर २८, शेवली २८, रामनगर २८.८, पाचणवडगाव ३०.५, धनगरपिंपरी ४७.३, राणीउचेगाव ३५.८, रांजणी ४०.५, तळणी १८.८, डोकसाळ २५.३, पांगरी २८.

बीड जिल्हा : दावलावडगाव २१.३, गेवराई ३८.५, मादळमोही ३८.५, उमापूर १६.८, माजलगाव २३.३, किट्टीअडगाव २४, अंबाजोगाई २१.५, लोखंडी सावरगाव २१.५, युसूफ वडगाव १८.५, होळ १८.५, बनसारोळा २१.५, तिंतरवणी १७.५.

लातूर जिल्हा : कासारखेडा २८.३, मुरुड २०.८, अहमदपूर २९, अंधोरी २३.८, औराद २८.३, कासारशिरशी २१.३, हलगरा १८.३, नागलगाव २६.८, वाढवणा ३६.३, नळगीर ३६.३, मोघा ४९, देवणी २४.३, घोंसी ३६.३.

धाराशिव जिल्हा : धाराशिव ग्रामीण २३.८, मुळज २१.३.

अतिवृष्टीची मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर : डोनगाव : ६६.८ , जालना जिल्हा : जालना ग्रामीण : ९८.८, लातूर जिल्हा : बोरोळ : ६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

SCROLL FOR NEXT