Prahar Janshakti Party Agrowon
ताज्या बातम्या

Prahar Janshakti Party : प्रहार देणार ‘एसएओ’ कार्यालयात गुरुवारी ठिय्या

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता. १५) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करीत विमा कंपनीने मात्र तुटपुंजी भरपाई खात्यात जमा केली आहे. या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Janshakti Party) वतीने गुरुवारी (ता. १५) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खरीप हंगामात सुरवातीला पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर जून महिन्यापासून मात्र पावसाची संततधार अनुभवण्यात आली. जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा तडाखा बसला. नद्या-नाल्यांना पूर आल्याने काठावरील जमीन खरडून गेली. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यानुसार मोठे नुकसान झाले असताना हजारो रुपयांचा भरणा करून विमा कंपनीने मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खातात १६ ते १०० रुपये याप्रमाणे भरपाई जमा केली आहे.

ही शेतकऱ्यांची एक प्रकारे क्रूर थट्टाच विमा कंपन्यांनी केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. अनेक मंडळातील शेतकरी सदोष पर्जन्यमापकामुळे नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर व्हावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे या विरोधात गुरुवारी पक्षाच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात प्रहारचे संजय देशमुख योगेश लोखंडे सुरेंद्र भीवगडे, कपिल उमप, दिनेश मेहरे, राजू हरणे, उमेश वाघ, अंकुश गायकवाड, विवेक बेले,किसनराव उमप, गौरव महाकोडे सहभागी होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, बिनव्याजी कर्ज पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

E Crop Survey: पावसाने मोठे नुकसान, पण ‘ई-पीक पाहणी’च नाही!

Revenue Department: महसूल विभागातील तिघे बडतर्फ, तवढेच निलंबित

Oilseed Production: टोकण पद्धतीच्या अवलंबाने तेलबियांच्या उत्पादनात वाढ

Saline Water Problem: सिंचनाच्या पाण्यात क्षार वाढण्याची कारणे आणि त्यावर उपाय

SCROLL FOR NEXT