Officials Suspension: दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीत शिरकाव करणाऱ्या भंडारा महसूल प्रशासनातील ७ अधिकाऱ्यांवर बडतर्फ व निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे..बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी लाटणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी मागील तीन वर्षांपासून लावून धरली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे जिल्ह्यातील शासकीय नोकरी मिळविलेल्या ३२२ दिव्यांगांसह प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू झाली. या पुनर्तपासणीतून दिव्यांगत्व जास्त दाखविणे, दिव्यांग नसताना बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या बोगस दिव्यांगांचा पर्दाफाश होण्यास सुरवात झाली आहे. .Revenue Department: समाधान अभियानाच्या पहिल्या दिवशी चार हजारांहून अधिक दाखल्यांचे वाटप.जिल्ह्यात ७ जणांनी दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. महसूल विभागातील एकूण २२ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची नागपूर वैद्यकीय मंडळामार्फत पुनर्तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ७ अधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस निष्पन्न झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ, तर तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. .तसेच एका नायब तहसीलदाराला बडतर्फ करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव जिल्हा निवड समितीने शासनाला पाठवला अाहे. तसेच मंडळ अधिकारी वसुंधरा वासनिक-इंगळे ( पुनर्वसन शाखा), तलाठी शारदा सूर्यभान झंझाड व विनोद भावे यांना जिल्हा निवड समितीने सेवेतून बडतर्फ केले आहे..Revenue Department: रत्नागिरीतील महसूल यंत्रणेचा होणार कायापालट.याशिवाय महसूल सहाय्यक शिवशंकर साखरवाडे, तलाठी योगराज बाबूराव डांगरे व महसूल सहाय्यक दिलीप सिंग भरतसिंग ठाकूर या तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे..तीन अधिकाऱ्यांची तपासणीस टाळाटाळजिल्हा महसूल प्रशासनात २५ संशयित आढळल्यानंतर नागपूर मेडिकल बोर्डाने सर्व संशयितांचे प्रवर्गनिहाय वैद्यकीय तपासणी करून त्याबाबतचा अहवाल ३० जानेवारीला जिल्हाधिकारी भंडारा यांना दिला. या अहवालात २२ कर्मचाऱ्यांची तपासणी झाली असून उर्वरित ३ कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी पाठविण्याचे नमूद केले. मात्र, या तीन अधिकाऱ्यांनी अजूनही तपासणी केलेली नसून त्यांना प्रशासनातर्फे कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे..बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहावे लागते. दिव्यांगांच्या लाभांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे- सावन कुमार, जिल्हाधिकारी, भंडारा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.