Agri Innovation: ‘‘भुईमुगाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचा प्रकार, बियाणांची निवड, बीजप्रक्रिया, योग्य खत व्यवस्थापन, कीड-रोगांच्या बंदोबस्ताचे नियोजन महत्त्वाचे ठरते. सोयाबीनमध्ये पेरणी पद्धतीपेक्षा टोकन पद्धतीचा अवलंब करून उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. नैसर्गिक शेती पद्धतीतून उत्पादनवाढीचे प्रयोग केले आहेत. तेथे शेतकऱ्यांनी भेट द्यावी,’’ असे आवाहन कणेरी कृषी विज्ञान केंद्राचे विशेषतज्ज्ञ डॉ. पांडुरंग काळे यांनी केले. .भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत (गळीत धान्य) आयोजित तालुकास्तरीय शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह चव्हाण, संग्राम कुपेकर, .Oilseed Production : 'राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियाना'ला केंद्रिय मंत्रिमंडळाची मंजूरी; तेलबिया उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित.अनिरुद्ध रेडेकर, शिवशंकर हत्तरकी, उपसभापती अमर हिडदुग्गी, सदस्य शिवाजी करिगार, सुनीता देसाई, प्रभावती बागी, स्नेहल जाधव, शिवगोंडा पाटील, रूपा केसरोळी, स्वप्नील इंगवले, सरपंच वंदना शेंडुरे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी सर्जेराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थित होते..Seed Production: खरिप पीकांचे एक लाख १५ क्विंटलवर बियाणे उत्पादन.पाल कृषी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. पांडुरंग मोहिते म्हणाले, की हुमणी नियंत्रणासाठी किडीचा जीवनक्रम समजावून घेतला पाहिजे. हुमणीपासून मोठे नुकसान होते. पाऊस लागवड तंत्रज्ञान विषयावर विशाल साळुंखे यांनी मार्गदर्शन केले..जागतिक शेतकरी महिला वर्षानिमित्त सोयाबीन, भुईमूग, तीळ यापासून तयार केलेल्या पाककृतींची स्पर्धा झाली. तालुक्यातील १५ महिलांनी यात सहभाग घेतला. ऑर्किड फुलांच्या चांगल्या उत्पादनाबद्दल शेतकरी सुभाष पाटील यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी प्रास्ताविकात गळीत धान्य योजनेचे महत्त्व सांगितले. कृषी विभागाचे अधिकारी, भडगावचे कृषी सहायक अनिल कांबळे यांच्यासह कृषी अधिकारी, सहायकांनी मेळाव्याचे नियोजन केले होते. सर्जेराव गायकवाड यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.