Agri Assistant Recruitment Agrowon
ताज्या बातम्या

Agri Assistant Recruitment : कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करणार; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

कृषी सहायकांच्या २११५ रिक्त पदांसाठी पुढील १५ दिवसांत जाहिरात काढण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील : ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : ‘‘कृषी विभागातील (Department of Agriculture) कृषी सहायकांच्या (Agriculture Assistant) २११५ रिक्त पदांसाठी पुढील १५ दिवसांत जाहिरात काढण्यात येईल. तसेच कृषी सहायकांना सहायक कृषी अधिकारी असे पदनाम करण्यासाठी लवकरच निर्णय करू,’’ अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.

सतीश चव्हाण, अब्दुलखान दुर्राणी आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सत्तार यांनी उत्तर दिले.

राज्यातील कृषी सहायकांची १७५७ पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.

एका कृषी सहायकावर १० ते १५ गावांचा कार्यभार आहे. तसेच बराच काळ पदे भरली नसल्याने कृषी पदवीधरांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ही पदे कधी भरणार, अशी विचारणा सदस्यांनी केली.

यावर कृषिमंत्री सत्तार म्हणाले, ‘‘कृषी विभागात सहायकांची ११५९९ पदे मंजूर आहेत. फेब्रुवारी २०२३ अखेर ९४८४ पदे भरली असून २११५ पदे रिक्त आहेत.

सध्या १८ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही सहायकांवर अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. वित्त विभागाने पदभरतीबाबत निर्बंध शिथिल केले आहेत.

मात्र आकृतिबंध अंतिम केलेला नाही. अशा विभागांना सरळसेवेच्या कोट्यातील ८० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार भरती सुरू आहे.’’

‘‘दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदे निश्चित करण्याचे निकष बदलण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी सहायक संवर्गाची सुधारित बिंदूनामावली प्रमाणित करून घ्यायची कार्यवाही संबंधित विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर सुरू आहे.

त्यानुसार पुढील १५ दिवसांत कृषी सहायकांच्या पदासाठी जाहिरात देऊन पदभरती केली जाईल,’’ असे सत्तार यांनी सांगितले.

सहायक कृषी अधिकारी असे नामांतर करा
राम शिंदे यांनी कृषी सहायकांना सहायक कृषी अधिकारी असे नाव देण्याची मागणी केली. असे केल्याने त्यांच्या पगारात कोणताही फरक पडणार नाही, किंवा सरकारी तिजोरीवर भार पडणार नाही.

त्यामुळे या पदाचा दर्जा वाढेल, म्हणून असे नामकरण करावे, अशी मागणी केली. यावर सत्तार यांनी ‘पुढील १५ दिवसांत हा निर्णय घेऊ,’ असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT