Cold Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता

राज्याच्या अनेक भागात असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी (ता. ६) उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी १०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Team Agrowon

पुणे : थंडी कमी अधिक होत असतानाच राज्यात दाट धुक्याची (Foggy Weather) चादर पसरली आहे. शुक्रवारी (ता. ६) पहाटेपासूनच अनेक भागात काही अंतरावरील दिसनेही शक्य नव्हते, तसेच सकाळी उशारापर्यंत सूर्य दर्शनही झाले नाही.

बऱ्याच ठिकाणी दिवसभर धुके आणि ढगाळ वातावरण (Cloudy Weather) पहायला मिळाले. आजपासून (ता. ७) विदर्भात किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या अनेक भागात असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी (ता. ६) उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी १०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. आजपासून (ता. ७) विदर्भात तर उद्यापासून (ता. ८) उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट काहीशी कमी झाली आहे. शुक्रवारी (ता. ६) उत्तर राजस्थानमधील बिकानेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ७) राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट कायम राहून, उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.६ (१५.४), जळगाव २२.९ (१५.२), धुळे २३.५ (११.०), कोल्हापूर २८.७ (१८.३), महाबळेश्वर २५.३(१३.९), नाशिक २५.७ (१६.२), निफाड २५.५ (१५.५), सांगली २९.२ (१८.४), सातारा ३०.८(१५.०), सोलापूर ३०.७ (१९.८),

सांताक्रूझ ३२.० (२०.४), डहाणू २७.२ (१९.०), रत्नागिरी ३३.० (१९.७), औरंगाबाद २५.८ (१२.४), नांदेड २९.० (१७.२), उस्मानाबाद - (१०.३), परभणी २७.५ (१६.५), अकोला २४.८ (१६.०), अमरावती २१.० (१३.१), बुलढाणा २०.२ (१५.०), ब्रह्मपूरी २५.१ (१५.१), चंद्रपूर २५.२ (१६.२), गडचिरोली २४.२(१६.२), गोंदिया २१.८(११.८), नागपूर १८.६ (१३.७), वर्धा २०.०(१४.२), यवतमाळ २५.० (१३.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT