Prime Minister Narendra Modi Agrowon
ताज्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी केली असून गेले तीन दिवस सलग बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही या दौऱ्याची तयारी करत असून सभेसाठी गर्दीचे नियोजन मुंबई आणि ठाण्यातील कार्यकर्त्यांकडे सोपविले आहे.

Team Agrowon

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज (ता.१९) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या वेळी विविध विकासकामांचा नारळ फुटणार आहे.

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी बांद्रा- कुर्ला संकुलात दुपारी चार वाजता जाहीर सभाही होणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेत उभी फूट पाडून सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येत आहेत. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी मोदी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांवर टीका केली होती.

त्यामुळे मुंबई दौऱ्यातील सभेत ते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काय बोलतात, याचीही उत्सुकता आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी केली असून गेले तीन दिवस सलग बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही या दौऱ्याची तयारी करत असून सभेसाठी गर्दीचे नियोजन मुंबई आणि ठाण्यातील कार्यकर्त्यांकडे सोपविले आहे.

दहिसर पूर्व ते डी. एन. नगर मेट्रो मार्गिका २ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या साडेबारा हजार कोटींच्या दोन मार्गिकांचे लोकार्पण या वेळी होईल.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, महापालिकेच्या तीन रुग्णालय, ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या १८१३ कोटींच्या कामाचे भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते होईल.

मुंबई विद्यापीठाची भिंत पाडली

बांद्रा कुर्ला संकुलाजवळील मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील संरक्षक भिंत पाडून त्यावर बुलडोझर चालविला आहे. महापालिकेच्या या कृत्यावर युवासेनेने आक्षेप घेतला आहे.

शिंदे गटाने बांद्रा कुर्ला संकुलात घेतलेल्या मेळाव्यावेळीही विद्यापीठाच्या परिसरात पार्किंग आणि अन्य कारणासाठी नासधूस केली होती. आताही पंतप्रधानांच्या सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी ही भिंत पाडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT