Solar Pump Agrowon
ताज्या बातम्या

Solar Pump : यंदा २ लाख सौरपंप वितरित करण्याचे नियोजन

देवेंद्र फडणवीस; कृषी फीडर सौरऊर्जेवर आणणार

टीम ॲग्रोवन

अमरावती : ‘‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना (PM Solar Pump Yojna) पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्व कृषी फीडर सौरऊर्जेवर (Solar Energy) आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शासकीय जमीन नसल्यास भाडेपट्ट्याने मिळवता येईल. त्याद्वारे जमीनधारक शेतकऱ्यांनीही उत्पन्न मिळेल.

त्याचप्रमाणे, शेतीला १२ तास वीज मिळेल. या योजनेद्वारे २ वर्षांत ४ हजार मे.वॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यात यंदा २ लाख सौरपंप वितरित करण्याचे नियोजन आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांनी दिली.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (ता. ७) नियोजन भवनात झाली. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, डॉ. रणजित पाटील, बच्चू कडू, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, राजकुमार पटेल,

बळवंत वानखेडे, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘विकासकामांच्या प्रशासकीय, तांत्रिक मान्यता आदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून कामांना वेग द्यावा. अमरावती विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. नाइट लँडिंगची सुविधा आधी पूर्ण करावी. विमानतळ धावपट्टीची लांबी २ हजार ३०० मीटर करण्यासाठी प्रस्ताव द्यावा.

चिखलदरा येथील ‘स्काय वॉक’ला स्टेट वाइल्ड लाइफ बोर्डाने मान्यता दिली आहे. केंद्राच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. मेळघाटातील वीज न पोहोचलेल्या २४ गावांना वीज मिळण्यासाठी गतीने हालचाली कराव्यात. या बाबतची परवानगी, आराखडा आदी तांत्रिक प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT