Shekhar Gaikwad Agrowon
ताज्या बातम्या

Sugaracane FRP : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन शांततेत समाप्त

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.11) पुण्यातील साखर संकुलावर धडक मोर्चा काढला. यावेळी शिष्टमंडळाने साखर आयुक्ताशी चर्चा केली.

Team Agrowon

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सोमवारी (ता.11) पुण्यातील साखर संकुलावर धडक मोर्चा काढला. यावेळी शिष्टमंडळाने साखर आयुक्तांशी चर्चा केली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर आयुक्तांनी मोर्चाला सामोरे जात शेट्टी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन शांततेत संपले.

ठळक घडामोडी पुढीलप्रमाणेः

- राजू शेट्टी म्हणाले, राज्यात कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही कारखान्याचा वजनकाटा तपासता येईल. चोरी दिसल्यास कारवाईला भाग पाडू. काटा मारणाऱ्याचा काटा बाजूला काढला जाईल. वजनकाटे तपासणाऱ्या भरारी पथकात शेतकरी वर्गाचेही दोन प्रतिनिधी संघटनेचे असतील. काही मुद्दे केंद्राच्या व काही मुद्दे राज्याच्या अखत्यारित आहेत. मात्र, आपले प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला वेळ नाही, असे दिसते आहे. शेतकरी भिकारी नाही. आम्ही भीक नव्हे तर हक्क मागतो आहोत.

- राज्य सरकार सत्तेच्या मस्तीत आहे. शेतकऱ्यांना ही मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही. थकित एफआरपी मिळणार नसेल तर आम्ही रस्त्यावर येऊ. असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

- सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ व १८ नोव्हेंबर ला राज्यातील दोन दिवसांच्या तोंडी बंद ठेवणार. ऊस वाहतूक करणारे एकही चाक १७, १८ नोव्हेंबरला चालणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Sunil Patil: दरवाढीच्या संकटातही शेतकरी हिताला प्राधान्य

Fuel Supply: शेतकऱ्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना : देवेंद्र फडणवीस

Weekly Weather: कमाल आणि किमान तापमानात घट सुरू

Maharashtra Bhumapak Bharti: राज्यात १५०० खासगी भूमापकांची नियुक्ती

Devasthan Inam Act: ‘देवस्थान इनाम’ कायद्याला विश्‍वस्तांचा विरोध

SCROLL FOR NEXT