Agriculture News : हिंगोली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या साडेसात हजारांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ६२ कोटी ५४ लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले..जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते..Farm Loan Waiver: लाभार्थी शेतकरी मयत असल्यास वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल का? .यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड आदी उपस्थित होते..Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल.पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, की कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने खरीप पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे जिल्ह्यात ४३ हजार ५४१ लाभार्थी असून, त्यापैकी ३१ हजार ३७२ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे..‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ८० हजार कृषीपंप ग्राहकांचे ५७२ कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे..यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत तंबाखूमुक्ती तसेच मृद व जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.