Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : ‘खरिपातील नुकसान भरपाई द्या’

मागील म्हणजेच २०२२ च्या खरिपात अतिपावसात पिकांची अतोनात हानी झाली. पीक नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाला अहवाल सादर झाला.

Team Agrowon

जळगाव ः मागील म्हणजेच २०२२ च्या खरिपात (Kharif Season) अतिपावसात पिकांची अतोनात हानी (Crop Damage) झाली. पीक नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करून प्रशासनाला अहवाल सादर झाला. परंतु जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना भरपाईसंबंधीचे अनुदान किंवा मदतनिधी मिळालेला नसल्याचे निवेदन आसोदा (ता. जि.जळगाव) येथील शेतकऱ्यांनी नुकतेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले.

श्री.गमे नुकतेच जळगाव शहरात जिल्हा प्रशासनासोबत बैठकीसंबंधी आले होते. यानिमित्त शेतकऱ्यांनी गमे यांची भेट घेतली. गमे व नंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनाही याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २०२२ मध्ये खरिपात कापूस, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांची मोठी हानी झाली. पाऊस सतत सुरूच होता. त्यात पिकांची माती, चिखल झाला. काही शेतकऱ्यांचे नुकसान ६० ते ८० टक्के झाले.

अलीकडेच राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यभरात ६७५ कोटींवर निधी मंजूर केला आहे. या निधीतून जळगाव जिल्ह्यात आसोदा, भादली व इतर भागातील शेतकऱ्यांना मदतनिधीचे वितरण करावे, अशी मागणी त्यात करण्यात आली.

अलीकडेच राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यभरात ६७५ कोटींवर निधी मंजूर केला आहे. या निधीतून जळगाव जिल्ह्यात आसोदा, भादली व इतर भागातील शेतकऱ्यांना मदतनिधीचे वितरण करावे, अशी मागणी त्यात करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT