Devna Irrigation Project Agrowon
ताज्या बातम्या

Devna Irrigation Project : ‘देवना’च्या वाढीव मोबदल्याचा मार्ग मोकळा

Forest Department : देवना जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या महिन्यापासून पेटलेले आंदोलन ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : देवना जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या महिन्यापासून पेटलेले आंदोलन ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाले आहे. वन विभागाच्या जमिनीच्या बदल्यात महसूल विभागाची जमीन देण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या पुढाकारातून पाच दिवसांत पूर्ण केली.

यामुळे खरवंडी, देवदरीची ६० हेक्टर गायरान जमीन वनखात्याकडे वर्ग होणार आहे. याचबरोबर ३ कोटींच्या वाढीव खर्चाला मान्यता मिळून प्रकल्पाचा १३ कोटींवरून १६ कोटींवर गेला आहे. यामुळे प्रधान सचिवांच्या आश्‍वासनानंतर ग्रामस्थांनी मंत्रालयासमोरचे आंदोलन तूर्त स्थगित केले.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाचे ८ कोटी ९५ लाख रुपयांची फेरनिविदा दोन आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती. यापूर्वी वनविभागाची जमीन हस्तांतर करण्याची जबाबदारी ठेकदारांवर सोपविल्याने त्यांनी निविदेतून माघार घेतली होती.

नव्या फेरनिविदेमध्येही त्याच अटी कायम असल्यामुळे देवना प्रकल्पासाठी प्रमुख अडथळा असलेला ५५ हेक्टर जमीन हस्तांतर मुद्दा सरकारी पातळीवर सोडविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महिन्यापासून आंदोलन सुरू केले होते.

आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, देवदरी येथील देवना सिंचन प्रकल्पासाठी वनखात्याची ५५.७५ हेक्टर बुडित क्षेत्रात जात आहे. त्याबदल्यात महसूल विभागाकडून पर्यायी जमीन मिळणे प्रस्तावित होते. मात्र वर्षानुवर्षे या प्रस्तावावर निर्णय झाला नाही.

वनविभागाला सध्याच्या वन जमिनीलगतची गायरान जमीन हवी होती, तशी जमीन असल्यासच असे अदलाबदलीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार होते. यावर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढून ग्रुप ग्रामपंचायत खरवंडी-देवदरी यांच्या मालकीची ६० हेक्टरपर्यंत जमीन वनखात्याकडे वर्ग करण्याचा ठराव ग्रुप ग्रामपंचायत खरवंडीकडून २३ जून २०२३ जलसंधारण खात्याकडे देण्यात आला.

त्यावर जलसंधारण विभागाने लगेच कार्यवाही सुरू केली. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यामुळे वनजमिनीला पर्यायी जमिनीची मुख्य अडचण दूर झाली आहे.वन आणि पर्यावरण खात्याच्या उर्वरित परवानग्या सक्षम सल्लागार यंत्रणेमार्फत जलसंधारण विभाग मार्गी लावणार आहे. असे जलसंधारणचे प्रभारी विभागीय सहसंचालक तथा कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते यांनी सांगितले.

देवनाचा साठवण तलाव लवकरात लवकर पूर्ण होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी रोजी पहाटे ४ वाजता मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. दप्तर दिरंगाई झाल्यास पुन्हा आंदोलन उभारले जाईल
भागवतराव सोनवणे, संयोजक-जलहक्क संघर्ष समिती, येवला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT