Rain Updates
Rain Updates Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती कायम

टीम ॲग्रोवन

पुणेः राज्यातील बहुतांश भागांत पावसाची (Rain) उघडीप कायम आहे. तर काही भागांत हलक्या श्रावण सरी (Rainfall) पडत आहेत. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय.

कोकणात पावसाचा जोर कमीच आहे. पालघर जिल्ह्यात काही मंडळात श्रावण सरी पडल्या. तर रायगड जिल्ह्यातील अनेक मंडळांत हलक्या सरी पडल्या. माथेरान, पोलादपूर आणि रोहा या मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हलका पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील नगर, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यांत पावसाची उघडीप कायम होती. तर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. गगणबावडा येथे मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही चार मंडळांमध्ये पावसाची भूरभूर सुरु होती. पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत पावसानं विश्रांती दिली. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मराठवड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही बहुतांश भागांत पावसाची उघडीप होती. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि वाशीम जिल्ह्यात पावसानं विश्रांती दिली. तर अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. चिखलदा येथे ३९ मिलिमीटर पाऊस झाला. तर वरूड, चांदूरबाजार, मोर्शी या मंडळांमध्येही लरक्या सरी पडल्या. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर इतर भागांत पाऊस नव्हता. गोंदीया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या सरी पडल्या.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जारी केला. तर काही भागांत हलक्या सरी होतील, असा अंदाज वर्तविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT