परिमल सिंह agrowon
ताज्या बातम्या

Pokara Project : ‘पोकरा’ प्रकल्प संचालकपदी परिमल सिंह यांची नियुक्ती

मराठवाडा, विदर्भातील पंधरा जिल्ह्यांमधील हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील गावांसाठी व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाची धुरा भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी परिमल सिंह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Team Agrowon

मुंबई ः मराठवाडा, विदर्भातील पंधरा जिल्ह्यांमधील हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील गावांसाठी व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाची (Pokara Project) धुरा भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी परिमल सिंह (Parimal Sigh) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

परिमल सिंह हे २००४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पोकरा प्रकल्प संचालक पदावर त्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे प्रकल्प संचालक श्याम तागडे यांची गृह विभागात नियुक्ती झाल्यानंतर पोकराला पूर्णवेळ प्रकल्प संचालक मिळाले असून, प्रकल्पाला गती देण्यासाठी याचा लाभ होईल. सिंह यांना प्रशासकीय सेवेतील दीर्घ अनुभव आहे.

यापूर्वी सिंह यांनी ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, राज्यपाल कार्यालयाचे अवर सचिव, अकोलाचे जिल्हाधिकारी अशा विविध प्रमुख पदांचा कार्यभार सांभाळला आहे.

हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास साह्य करणे हा पोकरा प्रकल्पाचा उद्देश आहे. प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तीसहून अधिक विविध घटकांसाठी ५० ते १०० टक्के अर्थसाह्य देण्यात येते. यामध्ये भूमिहीन, महिला, अल्पभूधारक शेतकरी, गट व गावांचे सक्षमीकरण केले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT