ताज्या बातम्या

Midday Meal : ‘माध्यान्ह’च्या धान्यात बदल होत असल्याची पालकांची तक्रार

जव्हार हा आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे. त्यामुळे या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे.

Team Agrowon

जव्हार, जि. पालघर : जव्हार हा आदिवासी (Tribal) लोकवस्ती असलेला तालुका आहे. त्यामुळे या भागात कुपोषणाचे (Malnutrition) प्रमाण अधिक आहे. पण शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना (student) माध्यान्ह आहार (Midday Meal) योजनेचा पोषण आहार मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तालुक्यात शालेय स्तरावर करण्यात येत असलेला धान्य पुरवठा हा बदलला जात असल्याची तक्रार जोर धरीत आहे.

तालुक्यातील २४६ शाळांत, माध्यान्ह आहाराकरिता पुरविण्यात येणाऱ्या धान्यात बदल करून पुरवठादाराकडून निकृष्ट दर्जाचे धान्य दिले जात असल्याचे आरोप पालक करीत आहेत. तालुक्यातील जि. प. शाळा व मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना या धान्यापासून बनलेला आहार खावा लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहेत.

राज्य शासन पोषण आहार योजनेतून परवडेल अशाच दरातून ही योजना राबवीत असताना, धान्य बदली, खराब दर्जाचे धान्य पुरवठा करणे, हे लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. यावर प्रशासनाने लक्ष देऊन योग्य प्रकारे शालेय पोषण आहार योजना राबविणे गरजेचे आहे.

- रूपाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

जव्हार तालुक्यातील माध्यान्ह आहार योजनेतील धान्य पुरवठा दर्जाबाबतच्या तक्रारीबाबत पडताळणी केली जात आहे. याबाबतच्या चौकशीत कुणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

- अमोल जंगले, तालुका गट शिक्षण अधिकारी, जव्हार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT