Papaya Market | Papaya Mandi Prices | Papaya rate stable in Khandesh
Papaya Market | Papaya Mandi Prices | Papaya rate stable in Khandesh Agrowon
ताज्या बातम्या

Papaya Market : खानदेशात पपई दर स्थिर

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात मागील आठवडाभरापासून पपईचे दर (Papaya Rate) स्थिर आहेत. थंडी वाढत असल्याने पपईला मागणी (Papaya Demand) किंवा उठावही आहे. यामुळे काढणी वेगात सुरू असून, दर प्रतिकिलो ११ ते १२ रुपये प्रतिकिलो थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे.

पपई काढणी नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात अधिक आहे. शहादा तालुक्यात खानदेशात सर्वाधिक साडेचार हजार हेक्टरवर पपई पीक आहे. खानदेशात एकूण सात हजार हेक्टरवर पपई पीक आहे. धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यांतही पपई आहे. याशिवाय जळगावमध्ये सुमारे अडीच हजार हेक्टरवर पपई पीक आहे.

जळगावमधील चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जामनेर या भागात पपई पीक आहे. जळगाव जिल्ह्यातही सध्या कमाल १२ रुपये प्रतिकिलोचा दर पपईस मिळत आहे. पपई खरेदीसाठी राजस्थान, दिल्ली येथील खरेदीदार शहादा भागात आले आहेत. एजंटच्या मदतीने ही मंडळी खानदेशात पपईची खरेदी करीत आहे. सध्या रोज ३१ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक खानदेशात होत आहे. थेट शिवारात जाऊन खरेदी केली जात आहे. त्यासाठी मजूर, वाहनाची व्यवस्था खरेदीदार करतात.

शेतकऱ्यांकडून फक्त काढणीची मजुरी घेतली जात आहे. शहादा, शिरपूर, चोपडा, जामनेर व इतर भागांत दर्जेदार पपई काढणीसाठी उपलब्ध होत आहे.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण या भागांतही खानदेशातील काही खरेदीदार पपईची पाठवणूक करीत आहेत. उत्तर भारतात थंडी कायम असल्याने तेथे मागणी चांगली आहे. स्थानिक भागात मात्र पपईला कमी उठाव आहे. थंडी जशी वाढेल, तसा स्थानिक बाजारातही पपईस उठाव वाढेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. पपईची आवकही स्थिर आहे. काही शेतकऱ्यांच्या बागांत ५० ते ६० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. थंडीच्या काळात पपई पक्व होण्यास वेळ लागतो. यामुळे पुढे आवक कमी होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT