Papaya Subsidy : पपई लागवडीसाठी ४५ हजार रुपये अनुदान

बिहार सरकारची योजना
Papaya Subsidy
Papaya Subsidy Agrowon
Published on
Updated on

भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात होते. तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई पिकातून मिळते. पपई फळ उपयुक्त आहेच याशिवाय  प्रक्रिया उद्योगातही पपईला महत्व आहे. पपईपासून टुटी-फ्रुटी, जॅम, जेली इ. पदार्थ तयार होतात तर पपईच्या पेपेनपासून औषधे, च्युईंगम तयार करतात. त्यामुळे निर्यातीतही पपईला चांगल्या संधी आहेत. अशा उपयुक्त पपई च्या लागवडीसाठी बिहार राज्यात अनुदान दिले जात आहे.

पपई लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकार ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे.  ही रक्कम एकात्मिक बागायती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिली जात आहे. एक हेक्टर पपई लागवडीसाठी ६० हजार रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. ७५ टक्के अनुदानाच्या आधारे शेतकऱ्यांना ४५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत आवळा, जांभूळ,फणस, डाळिंब आदी पिकाच्या लागवडीवरही ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. एकात्मिक फलोत्पादन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेसाठी पात्र बिहारी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन बिहार सरकारने केले आहे. 

Papaya Subsidy
Agriculture Subsidy : शेततळे, रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com