USA Pakistan Agrowon
ताज्या बातम्या

USA Pak Agreement : अमेरिकेसोबत सुरक्षा कराराच्या प्रस्तावाला पाकिस्तान मंत्रिमंडळाची मंजुरी

Pakistan Defense Deal : अमेरिकेबरोबर सुरक्षा करार करण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Pakistan News : अमेरिकेबरोबर सुरक्षा करार करण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. दोन देशांमधील अनेक वर्षे तणाव असून तो कमी करण्यासाठी या कराराचा फायदा होईल, असे येथील माध्यमांनी म्हटले आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्याच्या घटनेचा पाकिस्तान सरकारने कोणताही गाजावाजा केला नाही.

अमेरिकेबरोबरील प्रस्तावित करारामुळे पाकिस्तानला लष्करी उपकरणे आणि सामुग्री मिळू शकणार आहे. या कराराबाबत दोन्ही देशांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर आणि अमेरिकी लष्कराच्या मध्य विभागाचे प्रमुख जनरल मिशेल एरिक कुरिला यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट होऊन दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर आता त्यांच्यात ‘सीआयएस-एमओए’ या करार होणार आहे.

अमेरिका आपल्या मित्रदेशांबरोबर हा करार करते. पाकिस्तानबरोबर त्यांनी २००५ मध्ये हा करार केला होता. त्याची मुदत २०२० मध्ये संपली होती. तणावामुळे या कराराची मुदत वाढविली नव्हती. आता पुन्हा करार करून लष्करी संबंध प्रस्थापित केले जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मूग बाजारात चढ-उतार, कांदा दरात बदल, कोबीच्या आवकेत चढ-उतार, कोथिंबिरीच्या दरात घसरण तर डाळिंब दर तेजीत

Maharashtra Rain Update: राज्यात कोणत्या भागात पावसाची शक्यता?

PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजना २०२६ : घरबसल्या यादीत नाव तपासा; जाणून घ्या पात्रता आणि कागदपत्रे

Australia Cooperatives: ऑस्ट्रेलियातील सहकारी संस्था अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ

Free Sewing Machine Scheme: महिलांसाठी मोठी संधी! शिलाई मशीनसाठी मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT