Rice Harvesting  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : विक्रमगडमध्ये भात मळणीला वेग

ढवळ्या-पवळ्यांना एकत्र करून पुन्हा एकदा शेतावरील खळ्यांत भात झोडणीने वेग घेतला आहे. सद्यस्थितीत विक्रमगड तालुक्यातील बहुतेक भातकापणीची कामे आटोपली आहेत. त्यामुळे आता शेतकरी भात झोडणीच्या कामांना लागला आहे.

Team Agrowon

विक्रमगड : ढवळ्या-पवळ्यांना एकत्र करून पुन्हा एकदा शेतावरील खळ्यांत भात (Paddy) झोडणीने वेग घेतला आहे. सद्यस्थितीत विक्रमगड तालुक्यातील बहुतेक भातकापणीची (Paddy Harvesting) कामे आटोपली आहेत. त्यामुळे आता शेतकरी भात झोडणीच्या कामांना लागला आहे.

आजच्या आधुनिक युगात विविध यंत्रांचा शेती क्षेत्रात वापर केला जात असतानाही विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पारंपरिकता जपून भात झोडणीची-मळणीची कामे केली जात आहे.

विक्रमगडसारख्या ग्रामीण भागात मुखत्वेकरून आदिवासी वाड्या-वस्त्यांमध्ये मळणीची कामे पारंपरिक पद्धतीनेच केली जात आहेत. तालुक्यातील भातशेती कापणीची कामे जवळपास पूर्ण झाली असून ७ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रातील गावागावांत तयार भातपीक कापून आपल्या शेतामध्ये असलेल्या खळ्यावर साठविले जाते. त्यानुसार भात पिकाच्या मळणीची कामे सुरू झाली आहेत. दिवस मावळतीला जाताच शेतावरील खळ्यांमधून पारंपरिक गाणी गात शेतांमध्ये मळणीची काम जोमाने सुरू आहे.

कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या झालेल्या असल्या तरी काही प्रमाणात पेढींला भात शिल्लक राहतो. शेतावर किंवा घराजवळ यासाठी पारंपरिक खळे राखून ठेवलेले असते. या खळ्यांभोवती झोडलेल्या भाताच्या काड्यांपासून उडवी (ढीग) रचली जातात.

विशेष मेजवानी

विक्रमगड येथील जाणकार शेतकरी कांतीकुमार पाटील यांनी सांगितले, मळणीच्या काळात शेतावर खास गावठी कोंबड्यांचा झणझणीत रस्सा, नव्या तांदळाची भाकरी अशी मेजवानीचे आयोजन केले जाते. त्यामुळे सामूहिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या मळणींच्या कामात सर्वांमध्ये उत्साह असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT