ताज्या बातम्या

Paddy Seedling : वेल्हे तालुक्यात भात रोपे तरारली

वेल्हे तालुक्यामध्ये सर्वाधिक भाताचे उत्पन्न घेतले जाते. त्याचबरोबर नाचणी, वरई ही पिकेही घेतली जातात.

टीम ॲग्रोवन

वेल्हे, जि. पुणे ः जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या पावसामुळे प्रतीक्षेत असलेल्या वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा (Rain) संपली आहे. तालुक्याच्या सर्वच भागात पावसाने (Rainfall) हजेरी लावली असल्याने भात रोपे (Paddy Seedling) तरारली असून शेतरीवर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यातील पश्चिम भागात किल्ले तोरणा, राजगड परिसरात तसेच अठरा गाव मावळ या भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. तर, पूर्वपट्ट्यातील आंबवणे, करंजावणे, सोंडे परिसर या भागांत पावसाचा जोर कमी असला तरी तो समाधानकारक आहे.

वेल्हे तालुक्यामध्ये सर्वाधिक भाताचे उत्पन्न घेतले जाते. त्याचबरोबर नाचणी, वरई ही पिकेही घेतली जातात. लांबलेल्या पावसामुळे भात पेरणी दुबार करावी लागते का, या चिंतेत येथील शेतकरी होता. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस सुरू झाल्याने भात पिके तरारली आहेत.

तालुक्यात सर्वाधिक पेरणीच धूळ वाफेवर होते, त्यानुसार पेरणीही झाली. काही ठिकाणी तुरळक पडलेल्या पावसामुळे रोपे उगवली, मात्र दमदार पावसाअभावी ती जळून जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पाऊस एक महिना उशिरा आल्याने भात लावणी लांबली, त्यामुळे उत्पादनावर नक्कीच परिणाम होणार आहे. पिके घेताना प्रत्येक पिकाला एक ठरावीक कालावधी लागत असतो. भातपेरणी, लावणी व मळणी या दरम्यान योग्य वेळी पावसाची गरज असतेच अन्यथा दर्जेदार उत्पादन निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षांपासून समाधानरित्या पाऊस पडत होता, परंतु यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने अनेक ठिकाणच्या शेतीच्या लावणी पूर्व मशागती रखडल्या असून याचा भात शेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याची माहिती तानाजी कचरे या शेतकऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT