Osmanabadi Goat
Osmanabadi Goat Agrowon
ताज्या बातम्या

Osmanabadi Goat : उस्मानाबादी शेळी वार्षिक ऑनलाइन महोत्सव आज

Team Agrowon

वन वृत्तसेवा

परभणी : येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातर्फे पशुपालक शेतकरी, महिला बचत गट, व्यावसायिक, पशुधन पर्यवेक्षक तसेच पशुवैद्यक विद्यार्थी यांच्याकरिता मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. १७) उस्मानाबादी शेळी वार्षिक महोत्सवाचे आयोजन आभासी (ऑनलाइन) पद्धतीने सकाळी ११ ते दुपारी अडीच या वेळेत करण्यात आले आहे.

मराठवाडा भागातील अधिक काटक व रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या उस्मानाबादी शेळीचे, शेळीपालन व्यवसायात अनन्यासाधरण महत्त्व आहे. मराठवाड्यातील या शेळीच्या जातीचा शेळीपालन या व्यवसायाकरिता प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून महाविद्यालय निरंतर प्रयत्न करीत आहे.

ग्रामीण भागामध्ये शेळीपालन व्यवसायाशी संबंधित उद्योजक निर्माण करणे, ग्रामीण भागातील पशुपालकांचे जीवनमान उंचावणे, अधिक दूध, मांस उत्पादन करून राज्याची तद्वतच देशाची आर्थिक स्थिती उंचावणे तसेच शेतीला पूरक उद्योगांना ग्रामीण भागात चालना देऊन अर्थचक्र गतिमान करणे इत्यादी उद्दिष्ट समोर ठेवून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातर्फे दरवर्षी उस्मानाबादी शेळी वार्षिक महोत्सवाचे आयोजन करीत असते.

या उस्मानाबादी शेळी वार्षिक महोत्सवामध्ये, उस्मानाबादी शेळीचे संवर्धन – काळाची गरज, अर्धबंदिस्त शेळीपालन, शेळ्यांचे किफायतशीर आहार व्यवस्थापन, प्रजनन उस्मानाबादी शेळीचे, यशस्वी शेळी पालकांच्या यशोगाथा, करडांची मरतूक कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, शेळ्यातील चयापचयाचे आजार आणि निदानाचे महत्त्व, शेळ्यांचे आजार आणि औषधी वनस्पती, शेळी पालनातून आर्थिक स्थैर्य कसे प्राप्त करावे, अशा अत्यंत महत्त्वाच्या विविध विषयांवर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि विविध विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. उस्मानाबादी शेळी वार्षिक महोत्सवाचे आयोजन विनाशुल्क करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सुनीत वानखेडे (मोबाइल क्र. ९४२०६५३५१५) आणि डॉ. महेश चोपडे (मोबाइल क्र. ९४२१११७८३५) यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त पशुपालक शेतकरी, महिला बचत गट, व्यावसायिक, पशुधन पर्यवेक्षक तसेच पशुवैद्यक विद्यार्थी यांनी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आव्हान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विवेक देशमुख, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. नितीन मार्कंडेय डॉ. धनंजय देशमुख यांनी केले आहे.

कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी लिंक - https://zoom.us/j/92796300952?pwd=VEhKN3J1e

W82SEhHc2lUQXlVU0FRUT09

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT