Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Rate : प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढीस विरोध

महावितरणने केलेल्या प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढीवर आयोगाने हरकती मागवल्या आहेत. या दरवाढीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे.

Team Agrowon

Electricity Rate Hike गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : महावितरणने (Mahavitaran) केलेल्या प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढीवर (Electricity Rate Hike) आयोगाने हरकती मागवल्या आहेत. या दरवाढीला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात निवेदन प्रांत कार्यालयाला देण्यात आले.

खर्च वाढला, करा दरवाढ ही वीज कंपनीची मानसिकता अकार्यक्षमता दर्शविते. वीज चोऱ्या व भ्रष्टाचाराला मान्यता व प्रोत्साहन देणारी कार्यपद्धती बंद झाली पाहिजे. स्पर्धा, कार्यक्षमता, प्रामणिकपणा व इच्छाशक्ती या आधारावर एकूण खर्चावर कठोर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

दुर्दैवाने ही इच्छाशक्ती वीज कंपनीकडे कधीच नव्हती आणि नाही. याचा अनुभव ग्राहकांना २३ वर्षांपासून येत आहे. महावितरण कंपनीने ३७ टक्के वीजदरवाढीची मागणी केली आहे.

२३ वर्षातील ही सर्वांत मोठी दरवाढ आहे. सर्वाधिक विजेचे दर राज्यात असूनही इतकी प्रचंड मागणी सर्वसामान्य ग्राहकांना शॉक देणारी आहे.

ही दरवढ राज्यात येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व अस्तित्वातील उद्योगांना राज्याबाहेर घालवणारी आहे. वीज दरात आणखी भर पडल्यास त्याचे संतप्त पडसाद राज्यभर उमटणार आहेत.

यामुळे राज्य सरकारने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करावा. नागरिकांच्या दृष्टिने हिताचा निर्णय घ्यावा. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास वाढीव दराच्या प्रस्तावाची होळी करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT