Millet Processing
Millet Processing  Agrowon
ताज्या बातम्या

Millet Processing : भरधान्याच्या मूल्यवर्धनातून पूरक उद्योगाला संधी

Team Agrowon

सोलापूर ः यंदाचे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) म्हणून साजरे केले जात आहे. त्यात भरडधान्य हा घटक महत्त्वाचा आहे. त्यात पारंपारिक भरडधान्याचे मूल्यवर्धन (Millet Value Addition) केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. विशेषतः तरुण शेतकऱ्यांना पूरक उद्योगासाठी मोठी संधी त्यातून मिळेल, असे मत पंढरपूरच्या कडधान्य, तेलबिया पीक (Oil Seed) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. आर. एस. भदाणे यांनी व्यक्त केले.

मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात तरुण शेतकऱ्यांसाठी आयोजित मेळावा आणि शिवारफेरीप्रसंगी डॉ. भदाणे बोलत होते. जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. व्ही. पावस्कर, सोलापूरचे खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी पी. के. पलवेंचा, मोहोळ येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विठ्ठल पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे हे उपस्थित होते.

डॉ. भदाणे म्हणाले, की पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व ओळखूनच जागतिक पातळीवर हे वर्ष साजरे केले जात आहे. शेतीत ही पिके महत्त्वाची आहेत, पण आहारातील त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

अलीकडे त्याबाबत जागरूकता निर्माण होत आहे. त्यामुळे त्याच्या बाजारपेठेचा विचार करता मूल्यवर्धनातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. वळकुंडे यांनी तरुण शेतकऱ्यांनी नवीन पिकांच्या वाण, शिफारशी, शेती तंत्रज्ञान, कृषी पूरक उद्योग-व्यवसायाविषयी माहिती घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रात कधीही या, आम्ही मदत करू, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश क्षिरसागर यांनी केले.

तांत्रिक चर्चासत्रांना प्रतिसाद

तांत्रिक सत्रात पावस्कर यांनी रेशीम उद्योगासाठी शासकीय योजनांची माहिती दिली. श्री. पलवेंचा यांनी किफायतशीर मधुमक्षिका पालनाबाबत मार्गदर्शन केले, तर श्रीमती काजल म्हात्रे यांनी नैसर्गिक शेतीबाबत, दिनेश क्षिरसागर यांनी अन्न प्रक्रिया उद्योग, डॉ. पंकज मडावी यांनी जैविक कीड व रोग व्यवस्थापनबाबत, डॉ. सूरज मिसाळ यांनी बदलत्या हवामान आधारित शेती पद्धती या विषयावर सादरीकरण केले. या सर्वच सत्रांना शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : हळदीच्या भावातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद तसेच आल्याचे दर ?

Jowar Registration : ज्वारी विक्रीसाठी शासकीय केंद्रात अल्प नोंदणी

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT