Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : मोहोळ तालुक्यात केवळ वीस टक्केच पेरण्या

Kharif Season 2023 : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र मोहोळ तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर केवळ २० टक्के पेरणी केली आहे.

Team Agrowon

Mohol News : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र मोहोळ तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर केवळ २० टक्के पेरणी केली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, जी पेरणी झाली आहे त्यात सोयाबीनची पेरणी जादा झाली आहे. मोहोळ तालुक्याला मोठ्या पावसाची गरज आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले. त्यानंतर मृग, आर्द्रा आदी नक्षत्रे सुरू झाली. मात्र एकाही नक्षत्रात दमदार पाऊस झाला नाही. पाऊस नसल्याने व कडक उन्हामुळे विहिरी, बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ऊस, मका या पिकांसह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, बोर या फळबागा धोक्यात आल्या आहेत.

शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. मात्र चारा नसल्याने व आहे तो महाग झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. मात्र दुधाचा दर व जनावराला लागणारे विविध खाद्य यांचा ताळमेळ घातला तर दुग्ध व्यवसायही तोट्यातच आहे. उत्तम प्रकारे सांभाळलेल्या उसाचा चाऱ्यासाठी वापर होत असल्याने साखर कारखानेही अडचणीत आले आहेत.

बैलांची संख्या कमी झाल्याने शेतीच्या मशागतीची सर्व भिस्त आता लहान ट्रॅक्टरवर आहे. आहे ती पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असताना, आष्टी तलाव परिसरातील महावितरणने ५५ ट्रान्सफॉर्मरचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे.

पिण्यासाठी पाणी राखीव ठेवल्याने केवळ दोन तासच विद्युतपुरवठा सुरू ठेवला जात आहे. त्यामुळे साडेतीन हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT