Water Stock
Water Stock  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत अवघा ३२ टीएमसी पाणीसाठा

Team Agrowon

Pune Water Issue News : जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील २६ धरणांत मिळून अवघा ३२.८० टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.९८ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. जूनमध्ये वेळेवर पाऊस न झाल्यास पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या खडकवासला, चासकमान, डिंभे, पिंपळगाव जोगे, वीर, उजनी या धरणांतून उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत असून, धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी धरणांत ३९.७८ टीएमसी म्हणजेच २० टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी आवर्तनाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने धरणांत पाणीसाठा कमी राहिला आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील खडकवासला साखळी धरणातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांत अवघा ८.०६ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणातून डाव्या कालव्याला २६३ क्युसेक, तर उजव्या कालव्याला १०५४ क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. याशिवाय पुणे शहरालाही पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, कासारसाई, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत अवघा १०.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

त्यापैकी चासकमान धरणातून डाव्या कालव्याला ६०० क्युसेक, वीर धरणातून डाव्या कालव्याला ८२७ क्युसेक, उजव्या कालव्याला १५५० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणात ५.७४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी पिंपळगाव जोगे धरणातून डाव्या कालव्याला २६० क्युसेक, तर डिंभे धरणातून डाव्या कालव्याला ६५० क्युसेक, उजव्या कालव्याला २०० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

तर, उजनीचा पाणीसाठा -११.२५ टीएमसी एवढा असून डाव्या कालव्याला १६० क्युसेक, उजव्या कालव्याला १५२१ क्युसेकने पाण्याचे आवर्तन शेतीसाठी सोडण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT