Farm Pond Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Farm Pond Scheme : शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन व दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे देण्यात येते.

Team Agrowon

नाशिक : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन व दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे देण्यात येते. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२२-२३अंतर्गत पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये. तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग होण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाची योजना राबविण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी स्वखर्चाने किंवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केल्यास वैयक्तिक शेततळ्याच्या आकारमानानुसार ५० टक्के व सामूहिक शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

फलोत्पादनाच्या नोंदीसह सातबारा उतारा व ८-अ

आधार कार्डची छायांकित प्रत

आधार कार्ड संलग्न बँक पासबुकची छायांकित प्रत

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती संवर्ग प्रमाणपत्राची छायांकित प्रत

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

हमीपत्र व स्थळपाहणी अहवाल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation GR : तमिळनाडू सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Chemical Fertilizers Uses: जमिनीच्या गुणधर्मानुसार रासायनिक खतांचा वापर

Farmers Protest: बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकरी धडकणार

India Bangladesh Trade: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

Sushasan Week: सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात

SCROLL FOR NEXT