Onion Production
Onion Production Agrowon
ताज्या बातम्या

Onion Seed Production : कांदा बीजोत्पादन यंदा कमी

Team Agrowon

अकोला ः गेल्या काळात कांद्याला (Onion Seed Production) मिळालेले अत्यल्प दर (Onion Rate) तसेच पावसामुळे झालेले नुकसान (Onion Crop Damage) पाहता या हंगामात कांदा बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह असल्याने उत्पादक कंपन्यांनीही याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी यंदा आपला बीजोत्पादन कार्यक्रम रद्द करून दुसऱ्या बाबींवर लक्ष केंद्रित केले.

तर दुसरीकडे तयार असलेले कांदा बियाणे मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्यालाही पुरेशी विचारणा व दर नसल्याने एकूणच कांदा बीजोत्पादनाबाबत नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.दरवेळी दिवाळीच्या काळात रब्बीच्या लागवडीसोबतच कांदा बीजोत्पादनाची लगबग सुरू झालेली असते. यंदा रब्बीची लगबग आहे.

मात्र, कांदा लागवडीचा विषयच चर्चेतून बाद झालेला आहे. दरवेळेच्या तुलनेत यंदा ५० टक्केही बीजोत्पादन कार्यक्रम नसल्याचे शेतकरी सांगत आहे. राज्यात सुमारे १०० ते १५० कंपन्यांकडून कांदा बीजोत्पादनावर काम व्हायचे. या हंगामात अर्ध्यापेक्षा जास्त कंपन्यांनी कांदा बीजोत्पादन कार्यक्रमच नियोजित केला नाही.

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये कांदा बियाण्याची मागणी व्हायची. गेल्या काळात प्रामुख्याने मध्यप्रदेशात स्थानिक कांद्याला दर नाममात्र मिळाल्याने अनेकांचा उत्पादन खर्चही भागला नव्हता. परिणामी हा उत्पादक आता हरभरा, गहू या पिकांकडे परावर्तित झाला. याची झळ राज्यातील कांदा बीजोत्पादक कंपन्यांना सहन करावी लागली. अनेक कंपन्यांचे बियाणे तसेच पडून राहिलेले आहे.

सध्या ज्या कंपन्या थोड्या फार प्रमाणात बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवत आहेत, त्यांनी टोळ कांद्याचा दर १५०० ते २००० रुपये क्विंटल व बियाण्याचा दर २५ ते ४० हजारांदरम्यान काढले असल्याचे शेतकरी चर्चा करीत आहेत.

कांदा बियाणे पडून

कांदा लागवडीकडे कल कमी झाल्याचा फटका बियाणे कंपन्या तसेच शेतकऱ्यांनाही बसत आहे. काही शेतकरी हंगामासाठी दर्जेदार बियाणे तयार करून विक्री करतात. यातून पैसेही मिळतात. या हंगामासाठी तयार करून ठेवलेल्या बियाण्याच्या विक्रीला अद्यापही सुरुवात झालेली नाही. शेतकऱ्यांमधूनही विचारणा अत्यल्प आहे. जे बियाणे विकत आहे त्याचाही दर अवघा चारशे ते पाचशे रुपये निघाला. यातही दर कमी करून मागणी केली जाऊ लागल्याने उत्पादक शेतकरी चिंतातूर बनलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT