Fertilizer demand  Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Demand : रब्बीसाठी दीड लाख टनावर खतांची मागणी

Team Agrowon

Nanded News : रब्बी हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी एक लाख ७१ हजार टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. बाजारात आजघडीला एक लाख टन खते शिल्लक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळाली.

जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण बरे असल्यामुळे रब्बीमध्ये पेरणीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. रब्बीमध्ये सव्वादोन लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत चार लाख हेक्टरवर पेरणी होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त करून खते व बियाण्यांचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात यंदा आजपर्यंत ७८१.४० मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या ८७.७४ टक्के पाऊस झाला आहे. परिणामी, रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले आहे. यात बियाणे तसेच खताच्या उपलब्धतेबद्दल नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.

यानुसार कृषी विभागाने रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात रब्बीमध्ये सरासरी खताचा वापर एक लाख ५५ हजार टन आहे. रब्बीसाठी यंदा एक लाख ७१ हजार २३० टनाची मागणी कृषी विभागाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. आजअखेर एक लाख टन खताचा साठा शिल्लक, असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

रब्बीत चार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे. या तुलनेत यंदा चार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. यात सर्वाधिक तीन लाख ९१ हजार हेक्टरवर हरभरा पेरणीचा अंदाज आहे. यासोबतच गहू ४४ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी २८ हजार हेक्टर, करडई साडेपाच हजार हेक्टर, रब्बी मका साडेसात हजार हेक्टरवर पेरणी होईल अशी माहिती दिली.

ग्रेडनिहाय रब्बीसाठी खतांची मागणी

खताचा प्रकार सरासरी वापर कृषीची मागणी

युरिया ४६,२०४ ४८,०००

डीएपी २७,७४९ ३२,९१९

एमओपी १०,९५७ १९,३१६

एनपीके ५३,०२४ ४७,२६१

एसएसपी १७,१८१ २२,६०१

एकूण १,५५,११५ १,७१,२३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT