CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Chief Minister Eknath Shinde : खानदेशासाठी विभागीय महसूल आयुक्त कार्यालय

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) या तीन जिल्ह्यासाठी अमरावतीच्या धर्तीवर जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय सुरू करण्यात येईल. चोपडा, धरणगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, एरंडोल येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल.

तर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येईल. केळीवर आधारित उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी जळगाव जिल्ह्यातील भोकर (ता.जळगाव) येथे बोलताना केली.

जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे तापी नदीवर (Tapi River) उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील, आमदार लता सोनवणे, सुरेश भोळे, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

निधी कमी पडू देणार नाही

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील विकासासाठी आपण कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही. मायबाप शेतकऱ्यांच्या जीवनात आपण कोणतीही अडचण येवू देणार नाही.

जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पाला एक हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मागेच दिली आहे. नार पार प्रकल्पही मार्गी लावण्यात येईल. पाडळसरे (निम्न तापी) प्रकल्पाल मार्गी लावण्यात येईल, त्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल.

यावल येथील उपसा सिंचन योजनेचा प्रकल्पही मार्गी लावण्यात येईल. त्यासाठी ५९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले. गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.

केळीपासून प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन

जळगाव जिल्ह्याचे मुख्य पीक केळी असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, केळी पिकावर आधारित उद्योगासाठी आपले प्रयत्न राहणारा आहे.

केळीच्या खोडापासून कापड बनविण्याच्या उद्योगासाठी बाराशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून त्यांचे कामही सुरू झाले आहे. पोषण आहारात केळीच्या समावेशासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

याशिवाय जिल्ह्यात वारकरी व लोककला भवन उभारण्यात येईल. तसेच खानदेशला विशेष पॅकेज देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT