Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : दौंडमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

परिसरात गेल्या दोन दिवसांत १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

दौंड : परिसरात गेल्या दोन दिवसांत १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. (Heavy Rainfall) त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी सहाय्यक, तलाठ्यांना पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी दौंड तालुका भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर (Abhimanu Giramkar)यांनी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad) यांच्याकडे केली.

मागील दोन ते तीन दिवसांत तालुक्यातील देऊळगावराजे, वडगाव दरेकर, पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, आलेगाव, बोरीबेल या गावांमध्ये टोमॅटो, कपाशी, ढोबळी मिरची, उसाची नवीन लागण, सोयाबीन, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हाताशी आलेले पीक पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या वेळी सतीश आवचर, लालासाहेब गिरमकर, हरिश्चंद्र ठोंबरे, हेमंत कदम, संतोष पाचपुते, देविदास ढवळे, कपिल माने, हरी आवचर, भागवत काळे आणि शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT