Akola News : ई-पीकपेरा नोंदणीसाठी महसूल विभाग जनजागृती करीत असताना दुसरीकडे यासाठी वापरले जाणारे ॲपच योग्य पद्धतीने काम करीत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंद सध्या रखडलेली आहे.
त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने पीक नोंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा केली आहे. राज्यात आतापर्यंत ३५ टक्क्यांपर्यंतच नोंदणी झाल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या अॅपमध्ये नावनोंदणीनंतर काही टप्पेच पुढे जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अडचणी तयार झाल्या आहेत. याबाबत अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतून ई-पीक पेरा नोंदणीसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, अॅपचे पेज उघडल्यानंतर काही टप्पेच पुढे जात असून नंतर सातत्याने सर्व्हरमध्ये अडथळा येऊन प्रक्रिया पुढे जात नाही
वारंवार प्रयत्न करूनही ई-पीकपेरा नोंदणी होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पातूर येथील अरुण फुलारी म्हणाले, ‘‘नोंद करण्यासाठी ॲप उघडले तर नाव नोंदीच्या पुढे प्रक्रिया झाली नाही.’’ तर, जानेफळ येथील रमेश पाटील यांनाही नाव नोंदणी करता आली नाही, असे बोलताना सांगितले. ई-पीकपेरा नोंदणीला मुदतवाढ करण्यासाठी शासकीय स्तरावर मागणी करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील (बुलडाणा) यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.