Gayran Land  Agrowon
ताज्या बातम्या

Gayran Land : ‘गुरचरण’च्या मोजणीस विरोध

Latest Agriculture News : तालुक्यातील थळ समुद्रकिनारी ग्रामपंचायतीच्या ताब्यात साडेपाच हेक्टर गुरचरण जागा आहे. ही जागा कुंपण घालून संरक्षित केली जात आहे.

Team Agrowon

Alibaug News : थळ ग्रामपंचायतीतील गुरचरण जागेची मोजणी करून तारेचे कुंपण घालण्यात येणार आहे. सोमवारी जागेची मोजणी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी पोहोचले, मात्र गावातील कोळी बांधवांनी विरोध केल्‍याने तणाव निर्माण झाला होता.

अखेर पोलिसांच्या सुरक्षेत मोजणी करण्यात आली. गुरचरणाच्या जागेत कोळी समाजाचे मासळी सुकवण्याचे सिमेंटचे ओटे आणि मातीचे अंगण आहे. उदरनिर्वाहाचे साधन हिरावले जाणार असल्‍याचे विरोध होत आहे.

तालुक्यातील थळ समुद्रकिनारी ग्रामपंचायतीच्या ताब्यात साडेपाच हेक्टर गुरचरण जागा आहे. ही जागा कुंपण घालून संरक्षित केली जात आहे. या ठिकाणी कोळी बांधवांनी मासळी सुकविण्यासाठी सुरुवातीला मातीची अंगणे तयार केली होती. यानंतर काहींनी सिमेंटचे ओटे तयार केले, मात्र आता या जागेवर धनदांडग्यांच्या नजरा वळल्या आहेत.

गुरुचरणाला लागून असणाऱ्या फार्महाऊसची शोभा बिघडेल, यासाठी संबंधित जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे. गुरुचरणाची जागा मोजणी करण्यासाठी अनेकदा पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा मोजणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केला होता.

त्या वेळी जेसीबीच्या साह्याने काही सिमेंटचे ओटे तोडण्यात आले होते. स्थानिकांनी पोलिस बळाला न घाबरता जागा मोजणी आणि कुंपण घालण्यास तीव्र विरोध केला होता. सोमवारी (ता. ११) पुन्हा जागेची मोजणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने पोलिसांना पाचारण केले होते. कोळीवाडा ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मोजणीस विरोध केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने, ज्या जमिनी गुरचरणाच्या आहेत, त्या संरक्षित करण्यात येत आहेत. सोमवारी सकाळी मोजणी सुरू झाली तेव्हा काही लोकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर सामंजस्याने वाद मिटला असून वादग्रस्त जागेची मोजणी झाली असून कुंपण घालून ती संरक्षित केली जाणार आहे.
- नीतेश तेलगे, ग्रामसेवक, थळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

CCI Pending Dues: ‘सीसीआय’ची केंद्राकडे ८६ कोटींची थकबाकी

POCRA Scheme: ‘पोकरा’ योजनेसाठी समूह सहायकांची कामे करणार नाही

Cow Funding Crisis : राज्यमाता गाईंच्या परिपोषणाचा कोट्यवधींचा निधी थकित

SCROLL FOR NEXT