Bharaddhanya Agrowon
ताज्या बातम्या

International Millet Year : पौष्टिक भरडधान्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना मोठा वाव

आज भरडधान्ये ही ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असून, या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे.

Team Agrowon

अकोला ः आज भरडधान्ये ही ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असून, या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भरडधान्यापासून (Millet Crop) विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV, Akola) शास्त्रज्ञ डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले.

भारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून (Millet Year) घोषित केले आहे. त्या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शहा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर तालुक्यातील मौजे बारलिंगा येथे मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.

ग्रामीण क्षेत्रात आज शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया या भरडधान्यांचे विविध पदार्थ-नाचणीचे लाडू, वड्या, ज्वारी बाजरी भाकर, कुरडया, थालीपीठ, उपमा, नाचणी, ज्वारी, बाजरीची बिस्किटे, मुरमुरे, चटणी, ज्वारी पापड, नागलीचे पापड, भरडधान्यापासून अनेक पदार्थ बनवून त्यांची विक्री करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

मोतीलाल पाटील यांनी जुन्या काळात सर्वाधिक पसंती ज्वारी, बाजरी, नाचणीला होती. त्यामुळे आरोग्य सुद्धा चांगले राहत होते. पीएमएफई योजनाच्या वैशाली गाडे यांनीही मार्गदर्शन केले.

आत्माचे तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार यांनी मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी कृषी सहायक अनुसया निलखन, कृषी पर्यवेक्षक रवी धनभर यांच्यासह शेतकरी महिला उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT