Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांना नोटिसा

Sugarcane Season Maharashtra : ऊस गाळप हंगाम २०२२-२३ मधील शेतकऱ्यांच्या उसाच्या थकलेल्या ८१७ कोटी रुपयांच्या ‘एफआरपी’प्रकरणी राज्यातील ८६ कारखान्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा काढल्या आहेत.

Team Agrowon

Solapur News : ऊस गाळप हंगाम २०२२-२३ मधील शेतकऱ्यांच्या उसाच्या थकलेल्या ८१७ कोटी रुपयांच्या ‘एफआरपी’प्रकरणी राज्यातील ८६ कारखान्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा काढल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या कारखान्यांकडे १५ जुलैअखेर २२५ कोटी रुपये एफआरपी थकित आहे.

याबाबत साखर कारखान्यांची तीन टप्प्यांत सुनावणी घेऊन कारखान्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यांनतर तत्काळ एफआरपी न दिल्यास त्या साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात उसाची ऊसतोडणी वाहतूक खर्चासह एफआरपी ३५ हजार ५२४ कोटी रुपये इतकी होती. त्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३४ हजार ७०७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

१२५ कारखान्यांनी उसाच्या एफआरपीची १०० टक्के रक्कम दिली आहे. तथापि, उर्वरित ८६ कारखान्यांकडे अजूनही ८१७ कोटी रुपये एफआरपी थकित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आता पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत.

ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांमध्ये एफआरपी देण्यासंदर्भात करार झाल्याचे काही कारखाने सांगत आहेत. सुनावणीदरम्यान त्यांनी दिलेल्या लेखी म्हणण्यामध्ये कराराचा तपशील, ठरलेल्या टप्प्यानुसार दिलेली एफआरपीची रक्कम याची माहिती साखर आयुक्तालयाकडून घेतली जाणार आहे. रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी सांगितले.

साखर कारखान्यांनी हंगाम संपल्यावर ऊस उत्पादकांची एफआरपीची रक्कम देणे अपेक्षित होते. ८६ कारखान्यांकडे अद्यापही ८१७ कोटी रुपये एफआरपी थकित आहे. सुनावणीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वेळेत रक्कम न दिल्यास जप्तीच्या कारवाईचे आदेश काढले जातील.
-डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, साखर आयुक्त, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT