Jal Jeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’मधून एकही घर वंचित राहू नये

Water Supply Scheme : ग्रामीण भागात प्रत्येक गावाला आणि गावातील प्रत्येक घराला तसेच घरातील प्रत्येकाला सूक्ष्म नियोजनातून पाणी देणारी ही योजना आहे.

Team Agrowon

Nanadurbar News : जलजीवन मिशन योजनेतून कोणतेही गाव, घर आणि व्यक्ती वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, तसेच त्यासाठी पुढील आठवड्यात गावनिहाय सरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

जिल्हा परिषदेत पाणी स्वच्छतेच्या आढावा बैठकीत ते शुक्रवारी (ता. ११) बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, प्रमोद पाटील (धुळे), कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री गावितउपस्थित हाते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की ग्रामीण भागात प्रत्येक गावाला आणि गावातील प्रत्येक घराला तसेच घरातील प्रत्येकाला सूक्ष्म नियोजनातून पाणी देणारी ही योजना आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून येणारी ३० वर्षे वाढणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन पेयजल योजनेचे नियोजन करावयाचे आहे.

ग्रामसभेचे ठराव सादर करा

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करावयाची असून, यात ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्यांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात प्रत्येक गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेऊन योजनेतील अडचणी जागेवरच सोडविल्या जातील.

तसेच ज्या ठिकाणी पाण्याच्या स्रोतांअभावी योजनेत अडचणी येत आहेत, अशा गावांनी संभाव्य स्रोतांचा सर्व्हे करून या बैठकीत सादर करावा, तसेच ज्या गावांना विभागीय पाणीपुरवठा योजनेत सहभागी व्हायचे नाही त्यांनी तसे ग्रामसभेचे ठराव बैठकीत सादर करावयाचे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress Protest: ‘मनरेगा’ रद्दविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

Water Meter: पाणीपुरवठा संस्थांना नाही बसणार मीटर : डॉ. पाटणकर

Okra Cultivation: जळगाव जिल्ह्यात भेंडी लागवडीला वेग

Mahavistar AI: ‘महाविस्तार’ ॲपचा वापर करून शेतीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा

Ujani Dam: ‘उजनी’तून गुरूवारपासून शेतीसाठी पाणी मिळणार

SCROLL FOR NEXT