Election  Agrowon
ताज्या बातम्या

Co-operative Organisations Election : आंबेगावातील नऊ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

आंबेगाव तालुक्यातील नऊ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : आंबेगाव तालुक्यातील नऊ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा (Co-operative Organisations) निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या सहकारी संस्थांचा अर्ज दाखल करण्याची २० फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. तर मतदानाची प्रक्रिया १७ ते २१ मार्च दरम्यान पार पडणार आहे, अशी माहिती सहायक निबंधक पी. एस. रोकडे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यातील शिनोली आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा समावेश आहे.

तसेच भैरवनाथ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अवसरी खुर्द, डिंभे खुर्द आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आसाणे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तिरपाड आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तळेघर आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चास विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पेठ विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पिंपळगाव घोडे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नऊ सहकारी संस्थांची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

यामध्ये शिनोली, डिंभे खुर्द, आसाने तिरपाड, तळेघर या सोसायटींची अर्ज दाखल करायची मुदत १७ फेब्रुवारी आहे. तर अर्ज छाननी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

तर अवसरी खुर्द, चास, पेठ, पिंपळगाव घोडे या सोसायटींची अर्ज दाखल करायची मुदत २० फेब्रुवारी आहे. तर अर्ज छाननी २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सर्व सोसायटींची अर्ज माघारी घेण्याची मुदत ८ मार्च आहे. तर १७ मार्च रोजी तिरपाड, तर १८ मार्च रोजी शिनोली, अवसरी खुर्द, डिंभे खुर्द, तळेघर, १९ मार्च रोजी पिंपळगाव घोडे, पेठ, आसाने, तर २१ मार्च रोजी चास या सोसायटीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

निवडणूक लागलेल्या सोसायटीची अर्ज दाखल करणे, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप करणे इत्यादी निवडणूक प्रक्रिया मंचर येथील निवडणूक कार्यालयातून होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT