Ration Shop Agrowon
ताज्या बातम्या

Ration Shop : नव्याने ९० गावांत होणार रास्त भाव धान्य दुकाने

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील एकूण ९० गावांमध्ये विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने शासनाने दिलेल्या सूचनेनुसार मंजूर करण्यात आली आहेत.

ही दुकाने चालविण्यास इच्छुकांनी विहित नमुन्यात संबंधित तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित गावातील पंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था आणि महिला स्वयंसाह्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांनी अर्ज सादर करावेत.

या गावात होणार नवी दुकाने

तालुकानिहाय दुकानांची गावे ः उत्तर सोलापूर तालुका -१) नान्नज २) अकोलेकाटी व ३) बीबी दारफळ, माढा तालुका -१) उपळाई खुर्द व २) भीमानगर,

मोहोळ तालुका- १) शेटफळ २) शिरापूर मो. ३) लांबोटी ४) विरवडे खु., ५) वाघोलीवाडी,

माळशिरस तालुका- १) माळशिरस दु. क्र. ६ २) घुलेनगर. ३) फोंडशिरस- दु.क्र.३९ ४) फोंडशिरस दु.क्र.४० ५) दहिगाव ६) कळंबोली ७) अकलूज दु.क्र.६१ ८) अकलूज दु.क्र.६२ ९) अकलूज दु.क्र.६३ १०) अकलूज दु.क्र.६६ ११) माळेवाडी

१२) विझोरी १३) बागेचीवाडी १४) गिरझणी १५) संगम १६) गणेशगाव १७) श्रीपूर दु.क्र.१०२ १८) विठ्ठलवाडी १९) खळवे २०) विजयवाडी व २१) भांबुर्डी,

करमाळा तालुका - १) केडगाव २) शेलगाव (वा) ३) कविटगाव, ४) चिखलठाण ५) गुलमोहरवाडी ६) कावळवाडी व ७) बिटरगाव (वा), पंढरपूर तालुका - १) करकंब २) सुगावभोसे ३) बिटरगाव ४) पंढरपूर दु.क्र.६९ ५) पंढरपूर दु.क्र.८३ ६) पंढरपूर दु.क्र.८८

७) कासेगाव व ८) टप्पा, मंगळवेढा तालुका - १) खडकी २) माळेवाडी व ३) मंगळवेढा, अक्कलकोट तालुका- १) कुमठे २) कल्लहिप्परगे ३) नन्हेगाव ४) किणी ५) हालचिंचोळी ६) चपळगाव ७) कुरनूर ८) अक्कलकोट दु.क्र. १३ व ९) नागनहळ्ळी,

दक्षिण सोलापूर तालुका- १) कुंभारी २) बिरनाळ ३) राजुर ४) बसवनगर ५) भंडारकवठे ६) सादेपूर व ७) चिंचपूर,

बार्शी तालुका- १) बार्शी दु.क्र.५ २) उपळाई टो.दु. क्र.३६ ३) काळंबवाडी ४) काटेगाव ५) कापसी ६) खडकलगाव ७) गुळपोळी ८) अंबाबाईची वाडी ९) पांगरी दु.क्र.८६ १०) पिंपळगाव (धस) ११) बाभूळगाव १२) बोरगाव १३) तुळशीदासनगर १४) मालवंडी दु.क्र.१०४ १५) बार्शी दु.क्र.१४० १६) बार्शी दु.क्र.१५८ १७) अरणगाव १८) श्रीपतपिंपरी दु.क्र.१६१ १९) पांगरी १८९ २०) उपळाई टो. दु.क्र.१९३ व २१) वाघाचीवाडी,

सांगोला तालुका -१) बंडगरवाडी २) नलवडेवाडी ३) गावडेवाडी व ४) गुणापवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT